
थायलंड : थायलंड हा मगरींच्या शेतीमध्ये जगातील आघाडीचा देश मानला जातो. येथे सुमारे 1000 हून अधिक व्यावसायिक फार्म्स आहेत, जिथे 12 लाखांहून अधिक मगरी पाळल्या जातात. येथे मगरींचे मांस स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते आणि कातडीची निर्यात केली जाते.

व्हिएतनाम : आशियातील मगरींच्या कातडीचा हा एक मोठा पुरवठादार देश आहे. व्हिएतनाममध्ये शेकडो फार्म्स आहेत जिथे मगरींच्या प्रजननासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. प्रामुख्याने युरोपीय बाजारपेठेसाठी येथे उत्पादन घेतले जाते.

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियामध्ये 'सॉल्टवॉटर क्रोकोडाईल्स' (खाऱ्या पाण्यातील मगरी) पाळल्या जातात. येथील मगरींची कातडी जगातील सर्वात उच्च दर्जाची मानली जाते. उत्तर ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड आणि नॉर्दर्न टेरिटरीमध्ये हे फार्म्स मोठ्या प्रमाणावर आहेत.

अमेरिका : अमेरिकेत प्रामुख्याने 'ॲलिगेटर्स'ची शेती केली जाते. लुईझियाना आणि फ्लोरिडा ही राज्ये यासाठी प्रसिद्ध आहेत. येथील ॲलिगेटरची कातडी आणि मांस या दोन्हीला अमेरिकन बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

दक्षिण आफ्रिका : आफ्रिका खंडात मगरींच्या उत्पादनात दक्षिण आफ्रिकेचा प्रथम क्रमांक लागतो. येथे 'नाईल क्रोकोडाईल्स' पाळल्या जातात. येथील फार्म्स हे पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहेत.