
भारतात 140 कोटींपेक्षा जास्त लोक राहतात. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशापैकी एक आहे. पण भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त दिवस जगतात हे तुम्हाला माहिती आहे का?

भारतातील प्रत्येक राज्यातील लोकांचे सरासरी आयुर्मान हे कमी जास्त आहे. मात्र आज आप सर्वात जास्त आयुर्मान असलेल्या राज्याची माहिती जाणून घेणार आहोत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही राज्यांच्या सरासरी आयुर्मानाचा डेटा जारी केला होता. हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑन इंडियन स्टेट्समधील अहवालानुसार केरळ राज्यातील लोकांचे आयुर्मान सर्वात जास्त आहे.

केरळमधील लोकांचे सरासरी आयुर्मान 75.1 वर्षे आहे. म्हणजे येथील लोक सरासरी 75 वर्षे जगतात. येथील महिलांचे सरासरी आयुर्मान 79.9 वर्षे आहे आणि पुरुषांचे 72.2 वर्षे आहे.

जम्मू आणि काश्मीर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या ठिकाणचे लोक सरासरी 73.5 वर्षे जगतात. येथील महिलांचे आयुर्मान 76.2 वर्षे आणि पुरुषांचे आयुर्मान 71.6 वर्षे आहे.