GK : भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त ख्रिश्चन लोक राहतात?

Christian : भारतात प्रत्येक जाती धर्माचे लोक आढळतात. भारतात हिंदुंची संख्या जास्त असली तरी मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायाचेही लोक मोठ्या प्रमाणात आहेत. कोणत्या राज्यात ख्रिश्चन समुदायाचे लोक जास्त आहेत याची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 25, 2026 | 10:58 PM
1 / 5
सर्वात जास्त ख्रिश्चन लोकसंख्या असलेले राज्य: 2011 च्या जनगणनेनुसार आणि ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील केरळ राज्यात ख्रिश्चन लोकांची संख्या सर्वाधिक आहे. या राज्यात सुमारे 61 लाख ख्रिश्चन राहतात.

2 / 5
दुसऱ्या क्रमांकावरील राज्य: ख्रिश्चन लोकसंख्येच्या बाबतीत तमिळनाडू हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. येथे अंदाजे 44 लाख ख्रिश्चन अनुयायी आहेत.

3 / 5
सर्वात जास्त टक्केवारी असलेले राज्य: जर आपण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ख्रिश्चन धर्माच्या टक्केवारीचा विचार केला, तर नागालँड हे राज्य आघाडीवर आहे. येथील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 87.93% लोक ख्रिश्चन आहेत. मिझोराम (87.16%) आणि मेघालय (74.59%) ही राज्ये त्यानंतर येतात.

4 / 5
ख्रिश्चन बहुसंख्य राज्ये: भारतातील ईशान्येकडील तीन राज्ये नागालँड, मिझोराम आणि मेघालय ही ख्रिश्चन बहुसंख्य राज्ये आहेत. याशिवाय मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमध्येही ही लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.

5 / 5
भारतातील एकूण प्रमाण: भारताच्या एकूण लोकसंख्येत ख्रिश्चन धर्माचे प्रमाण साधारणपणे 2.3% इतके आहे. हिंदू आणि इस्लाम नंतर ख्रिश्चन हा भारतातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे.