GK : महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्हा कोणता?

Poor District of Maharashtra : महाराष्ट्रात सध्या एकूण 36 जिल्हे आहेत. यातील काही जिल्हे हे सधन आहेत, तर काही जिल्हे हे गरीब आहेत. आज आपण राज्यातील सर्वात गरीब जिल्हाची माहिती जाणून घेणार आहोत.

बापू गायकवाड | Updated on: Feb 14, 2026 | 7:30 PM
1 / 5
गरिबीचे प्रमाण : नंदुरबार हा महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्हा आहे. या जिल्ह्यातील गरिबीचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. विविध अहवालानुसार, या जिल्ह्यातील सुमारे 33% ते 52% जनता आजही गरिबी रेषेखाली किंवा बहुआयामी गरिबीमध्ये जीवन जगत आहे. राज्याच्या सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण खूपच जास्त आहे.

गरिबीचे प्रमाण : नंदुरबार हा महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्हा आहे. या जिल्ह्यातील गरिबीचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. विविध अहवालानुसार, या जिल्ह्यातील सुमारे 33% ते 52% जनता आजही गरिबी रेषेखाली किंवा बहुआयामी गरिबीमध्ये जीवन जगत आहे. राज्याच्या सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण खूपच जास्त आहे.

2 / 5

दरडोई उत्पन्न : नंदुरबारचे दरडोई उत्पन्न 1 लाख 29 हजार 146 प्रती वर्ष आहे, जे महाराष्ट्रातील सर्वात कमी दरडोई उत्पन्न मानले गेले आहे. तर महाराष्ट्रातील सरासरी दरडोई उत्पन्न 2 लाख 78 हजार 681 रुपये आहे.

3 / 5

भौगोलिक स्थान आणि दुर्गमता : हा जिल्हा महाराष्ट्राच्या उत्तर टोकाला, सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला आहे. दुर्गम डोंगराळ भाग आणि घनदाट जंगलांमुळे या भागाचा विकास उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत संथ गतीने झाला आहे.

4 / 5

आदिवासी बहुल लोकसंख्या : नंदुरबार हा एक मुख्यत्वे 'आदिवासी जिल्हा' म्हणून ओळखला जातो. येथील लोकसंख्येपैकी सुमारे 70% पेक्षा जास्त लोकसंख्या आदिवासी (उदा. भिल्ल, पावरा, धानका) आहे. या समाजातील अनेक घटकांपर्यंत अजूनही मुख्य प्रवाहातील आर्थिक संधी पोहोचलेल्या नाहीत.

5 / 5

रोजगाराच्या संधींची कमतरता : जिल्ह्यात मोठ्या उद्योगांचा अभाव असल्याने स्थानिक रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. येथील लोकांचे उपजीविकेचे मुख्य साधन शेती आहे, परंतु ती पावसावर अवलंबून असल्याने वर्षभर काम मिळत नाही. परिणामी, दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मजूर कामाच्या शोधात शेजारील गुजरात राज्यात किंवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत स्थलांतर करतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us