
भारताला राजा महाराजांचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे दर्शन आपल्याला देशाच्या कानाकोपऱ्यात पहायला मिळते. भारताचा समृद्ध इतिहास जपणारे शेकडो किल्ले सध्या भारतात आहेत.

राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये सर्वात जास्त किल्ले आहेत. जे भारताच्या गौरवशाली इतिहासाची आणि भव्य संस्कृतीची साक्ष देत उभे आहेत. आज आपण कोणत्या राज्यात सर्वात जास्त किल्ले आहेत ते जाणून घेणार आहोत.

आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त किल्ले आहेत. पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रात 350 पेक्षा जास्त किल्ले आहेत. यातील बहुतेक किल्ले हे डोंगरावर असून ते दगडाने बांधलेले आहेत. यात वास्तुकलेची झलक पहायला मिळते.

राज्यातील जवळपास सर्वच किल्ले छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित आहेत. या किल्ल्यांचे बांधकाम हे केवळ राहण्यासाठी नव्हे तर सुरक्षा आणि व्यापाराच्या दृष्टीने करण्यात आलेले आहे.

रायगड, राजगड, सिंहगड, पुरंदर, प्रतापगड, सिंधुदुर्ग यासह अनेक किल्ल्यांना खास महत्त्व आहे. राज्याच्या पुरातत्त्व विभागाकडून या किल्ल्यांची देशभाल केली जाते.