
उड्डाण घेण्याची पद्धत : इतर पक्ष्यांप्रमाणे वटवाघळे जमिनीवरून उड्डाण करू शकत नाहीत. त्यांचे पंख हवेत लिफ् निर्माण करण्यासाठी सक्षम नसतात. त्यामुळे उंचावरून खाली झोकून देत ते उड्डाण करतात.

पायांची विशिष्ट रचना : वटवाघळांचे मागचे पाय खूप लहान आणि अविकसित असतात. त्यामुळे ते जमिनीवर उभे राहू शकत नाहीत किंवा इतर पक्ष्यांप्रमाणे धावून उड्डाणासाठी लागणारा वेग पकडू शकत नाहीत.

ऊर्जेची बचत : उलटे लटकणे ही वटवाघळांसाठी सर्वात आरामदायी स्थिती असते. यासाठी त्यांना कोणतीही स्नायूंची ताकद वापरावी लागत नाही. त्यांच्या शरीराचे वजनच त्यांचे पंजे घट्ट धरून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे त्यांची ऊर्जा वाचते.

विशेष 'टेंडन' लॉकिंग सिस्टीम : वटवाघळांच्या पायात विशिष्ट स्नायूबंध असतात. जेव्हा ते फांदीला पकडतात, तेव्हा त्यांच्या शरीराच्या वजनामुळे हे पंज्याचे लॉक आपोआप बंद होते. यामुळे ते गाढ झोपेत असले तरी खाली पडत नाहीत.

शिकाऱ्यांपासून संरक्षण : वटवाघळे प्रामुख्याने गुहा किंवा झाडांच्या उंचावरच्या फांद्यांवर उलटी लटकतात. अशा ठिकाणी साप किंवा इतर हिंस्र प्राणी सहज पोहोचू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांचे संरक्षण होते.