
तापमान नियंत्रण : काळे पट्टे उष्णता शोषून घेतात आणि पांढरे पट्टे ती परावर्तित करतात. यामुळे झेबऱ्याचे शरीर हे योग्यरित्या तापमान नियंत्रित करते. परिणामी झेबऱ्याचे शरीर थंड राहण्यास मदत होते.

कीटकांपासून संरक्षण : अनेक अभ्यासांनुसार, हे काळे आणि पाढरे पट्टे 'घोडा माश्या' आणि 'त्सेत्से माश्या' यांसारख्या चावणाऱ्या कीटकांना गोंधळात टाकतात आणि दूर ठेवतात.

शिकाऱ्याला फसवण्यासाठी फादेशीर : जेव्हा झेबरे कळपात उभे असतात किंवा धावत असतात, तेव्हा हे पट्टे एकत्रित होऊन एका मोठ्या आणि हलणाऱ्या द्रव्याचा भास निर्माण करतात. यामुळे सिंह किंवा तरस या शिकारी प्राण्यांना एकाच प्राण्यावर नजर ठेवणे कठीण होते.

काळे पांढरे पट्टे का असतात : झेबऱ्याच्या अंगावरील पट्ट्यांचा विकास हा त्यांच्या त्वचेतील 'मेलेनिन' नावाचे रंगद्रव्य तयार करणाऱ्या पेशींच्या जनुकीय कारणामुळे होतो. त्वचेवर ज्या ठिकाणी मेलेनिन नसते तेथील रंग पाढरा असतो.

झेबऱ्याच्या पट्ट्यांचे नेमके कोणते कारण सर्वात महत्त्वाचे आहे यावर वैज्ञानिकांमध्ये अजूनही मतभेद आहेत, मात्र वरील सर्व कारणे तितकीच महत्त्वाची आहेत असे मानले जाते.