
तुम्ही पाहिले असेल की, जेव्हा आपण आग लावतो तेव्हा धूर नेहमीच वरच्या दिशेने जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की धूर खाली का जात नाही? तो नेहमी वरच्या दिशेने का जातो? या प्रश्नाचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

जे लोकांनी विज्ञानाचा अभ्यास केलेला आहे अशा लोकांना याचे उत्तर माहिती असेल. मात्र बऱ्याच लोकांना यामागील कारण माहिती असणार नाही. यामागील खरे कारण खूप खास आहे.

धूर वरच्या दिशेने जाण्याचे कारण म्हणजे हवेची कमी घनता. धूर हा लहान कण, वायू आणि पाण्याच्या वाफेपासून बनलेला असतो. एखादी वस्तू जळल्यावर धूर वर येतो, म्हणजे जळल्यानंतर त्याच्या सभोवतालची हवा गरम होते.

हवा गरम झाल्यामुळे ती खूप हलकी होते. जेव्हा हवा गरम होते तेव्हा हवेचे रेणू जलद गतीने हलतात आणि पसरतात, ज्यामुळे हवेची घनता कमी होते. यामुळे गरम हवा आणि धूर हलका होतो आणि तो वरच्या दिशेने जातो. कारण गरम हवा थंड हवेपेक्षा हलकी असते. त्यामुळे ती वरच्या दिशेने जाते.

या प्रक्रियेत पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्तीही महत्त्वाची भूमिका बजावते. थंड हवा जी जड असते, ती गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे खाली खेचली जाते. तर गरम धूर हलका असतो, तो वरच्या दिशेने ढकलला जातो.