Nepal Nepo Kids : नेपाळमध्ये तरुणांचा नेपो बेबींवर उद्रेक, ग्लॅमरस श्रृंखला खातेवाडा टार्गेटवर; कारण काय?

नेपाळमध्ये सध्या अराजक माजले आहे. या देशात तरुणांच्या उठावामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना पायऊतार व्हावे लागले आहे. दरम्यान, तरुणांमध्ये रागाचा उद्रेक झालेला असताना अता इथे श्रृंखल खातीवाडा नावाच्या ग्लॅमरस तरुणीची चर्चा होत आहे..

Updated on: Sep 11, 2025 | 11:49 PM
1 / 6
नेपाळच्या तरुणांनी एकत्र येत तेथील सरकार उलथवून लावलं आहे. आता तिथे लवकरच नव्या सरकारची स्थापना होणार आहे. तेथील तरुणांनी संसद, पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्र्‍यांची निवासस्थाने पेटवून दिली आहेत.

2 / 6
दरम्यान, आता तरुणांनी एकत्र येत नेपाळमधील केपी शर्मा ओली यांचे सरकार उलथवून लावले असले तरी आता तेथील नेपो किड्सना टार्गेट केले जात आहे. माजी मंत्री, माजी पंतप्रधान यांच्या कुटुंबातून येणाऱ्या तरुण, तरुणींवर आता टीका केली जात आहे.

3 / 6
गर्भश्रीमंत घरातून आल्याने माजी मंत्री, माजी पंतप्रधानांच्या कुटुंबातील मुलांचे लाईफस्टाईल अतिशय उच्च दर्जाचे आहे. त्यामुळेच आता जेन झींच्या टार्गेटवर ते आले आहेत. यात प्रामुख्याने श्रृंखला खातीवाडा हिचे नाव घेतले जात आहे.

4 / 6
मिळालेल्या माहितीनुसार श्रृंखला खातीवाडा ही मीस नेपाळ वर्ल्ड राहिलेली आहे. तिच्या ग्लॅमरस लुकवर तेथील अनेक तरुण फिदा आहेत. तिचे राहणीमानही उच्च दर्जाचे आहे. तिलाच आता सर्वाधिक ट्रोल केले जात आहे.

5 / 6
नेपाळमधील संतापलेल्या तरुणांनी श्रृंखला खातीवाडा हिच्या घरालाही आग लावली आहे. 29 वर्षांची श्रृंखला नेपाळचे माजी आरोग्यमंत्री बिरोध खातीवाडा यांची मुलगी आहे.

6 / 6
 तिचे महागडे कपडे, उच्च दर्जाचे राहणीमान, परदेश यात्रा यामुळे आता तिला ट्रोल केल जात आहे. नेपाळमध्ये तिला नेपो किड मानले जात आहे. त्यामुळेच नेपाळच्या तरुणांमध्ये तिच्याविरोधात सध्या राग आहे.