Gold And Silver Price Today : सुवर्णपेठेला दे धक्का, सोने-चांदीची ग्राहकांनीच घेतली ‘फिरकी’; जळगावच्या सराफा बाजारात घडलं तरी काय?

Gold And Silver Price Today : जळगावच्या सुवर्णपेठेत सोने आणि चांदीने यंदा मोठा गेम पलटवला. म्हणता म्हणता सोन्याने लाखाचा टप्पा ओलांडला. तर चांदीने सव्वा लाखाची मजल मारली. या दरवाढीविरोधात ग्राहकांनी अशी नाराजी दर्शवली.

| Updated on: Sep 17, 2025 | 3:00 PM
1 / 8
जळगावच्या सराफ बाजारात सोने चांदीच्या वाढत्या दराचा ग्राहकांवर देखील मोठा परिणाम झाला असून सराफ बाजारांमध्ये ग्राहकांची संख्या घटल्याचे चित्र आहे

2 / 8
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली असून दराने पुन्हा विक्रमी उच्चांकी गाठली आहे

3 / 8
सोन्याच्या दरात १ हजार १०० रुपयांनी आणि चांदीच्या भावात १ हजार ३०० रुपयांची वाढ झाली आहे

4 / 8
सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा १ लाख १४ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे तर चांदी चे दर जीएसटीसह प्रति किलो १ लाख 33 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत

5 / 8
सराफ बाजारांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची होणारे गर्दी आता कुठेतरी कमी झाल्याचे चित्र असून वाढत्या उच्चांकी दरामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे..

6 / 8
एकीकडे वार टेरिफ युद्ध सुरू असून दुसरीकडे आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी जपान, चीन या सह युरोपियन देश सोन्यामध्ये गुंतवणूक करत असल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या चांदीच्या दरावर झाल्याचं सराफ व्यवसायिकांचं म्हणणं आहे

7 / 8
गेल्या 15 दिवसात सोन्या आणि चांदीचा दर 5 ते सहा हजार रूपयांनी वाढला असून  आगामी काळात देखील सोन्या चांदीचे दर आणखीन वाढतील अशी शक्यता सराफ व्यवसायिक यांनी व्यक्त केले आहे.

8 / 8
सोने आणि चांदीचे दर कुठेतरी कमी होतील या प्रतीक्षेत ग्राहक असल्यानेच सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे