
गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दोन्ही धातु उच्चांकावर आहेत.

सध्या सोन्याचे जीएसटीसह दर हे एक लाख 13 हजार 500 रुपयांवर तर चांदीचे जीएसटी सह दर 1 लाख 33 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या वाढलेल्या दराचा फायदा करून घेण्यासाठी सोने मोड करण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

कमी भावात घेतलेलं सोन्याला आज चांगला परतावा मिळत असल्याने सोने मोड करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे

चांगला परतावा मिळत असल्याने सोन्याची मोड करण्यासाठी ग्राहकांची सराफ बाजारात दुकानामध्ये गर्दी होत असल्याचे चित्र आहे

पुढील दिवसात भाव कमी झाले तर नुकसान होण्यापेक्षा आजच आहे त्या दरात सोन मोड करून फायदा करून घेत असल्याचे ग्राहकांनी सांगितले.

वर्षभरातच खरेदी केलेल्या सोन्याला दुप्पट आणि चांगला परतावा मिळत असल्याने सोन मोड करण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे सराफ व्यावसायिक यांचे म्हणणे आहे.