Todays Gold Rate: वाह! सोन्याचा भाव आपटला, लगेच खरेदी करा.. आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?
Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. कारण सोने आणि चांदीचे भाव चांगलेच ढासळले आहेत. चांदीचे भाव तर थेट 65 हजारांनी घसरले आहेत. चला जाणून घेऊया सोन्याचा आजचा भाव काय?

सध्या सगळीकडे लग्नाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकांचा कल हा सोने आणि चांदी खरेदी करण्यावर असतो. पण सध्याचे सोने आणि चांदीचे भाव पाहाता अनेकांना खरेदी करताना दहा वेळ विचार करावा लागतोय. जर तुम्ही देखील सोने आणि चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. कारण, सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीचे भाव सतत भरारी घेत आहेत. पण आजचा दिवस हा सर्वसमान्यांना दिलासा देणार आहे. गेल्या आठवडाभरात देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत लक्षणीय घट झाली असून, चांदीचे दरही मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत.

गेल्या सात दिवसांत सतत वाढत असणारे २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम ३,९८० रुपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचे दर ३,६५० रुपयांनी कमी झाले आहेत. आज, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५६,७५० रुपये आहे. तसेच मुंबईत हेच दर १,५६,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर आहेत.

सोन्या पेक्षा चांदीच्या किंमतीत सतत लक्षणीय वाढ होत आहे. पण आज अचानक चांदीचे भाव थेट 65000 हजारांनी घसरले आहेत. ३० जानेवारी रोजी ४ लाखांच्या पार गेलेली चांदी आज प्रति किलो २,८५,००० रुपयांवर आली आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)