
सोन्या, चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढ सुरूच आहे, आता पुन्हा एकदा आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, चांदी देखील चांगलीच महाग झाली आहे.

जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात आज प्रति तोळ्यामागे तब्बल 1100 रूपयांची तर चांदीच्या दरात प्रति किलो मागे 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

त्यामुळे आता जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर विना जीएसटी प्रती तोळा 1 लाख 24 हजार 400 रुपयांवर पोहोचले आहेत, तर चांदीचा दर 1 लाख 80 हजार रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात सतत वाढच होताना दिसत आहे, सोन्या -चांदीचे दर गगनाला भिडले असून, सोने खरेदी सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.

दिवाळीनिमित्त सराफा बाजारात मोठी उलाढाल होत असते, मात्र यंदा सोन्याचे दर प्रचंड वाढल्यानं, मागणी घटून या उलाढालीला ब्रेक लागण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.