
गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात चढउतार झालेला पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मात्र सामान्यांना दिलासा मिळत असून या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव घसरत आहे. आजदेखील 2025 सालाच्या शेवटच्या वर्षी सोन्याचा भाव चांगलाच घसरला आहे.

सलग दोन दिवस सोने आणि चांदीच्या भावात घसरण होताना पाहायला मिळत आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएनशच्या नुसार 30 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,23,293 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये होता. आता हाच भाव बुधवारी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी 1,21,919 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे.

वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 133099 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला. हा भाव मंगळवारी 134599 रुपयांवर होता. म्हणजेच मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सोन्याचा भाव 1500 रुपयांनी कमी झाला आहे.

22 कॅरेट सोन्याचा भाव मंगळवारी 123293 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये होता. हाच भाव 31 डिसेंबर रोजी 121919 रुपयांपर्यंत खाली आला. म्हणजेच हा भाव 1374 रुपयांपर्यंत कमी झाला. चांदीच्या भावाबद्दल सांगायचे झाल्यास मंगळवारी 232329 रुपये प्रति किलोवर होता. हाच भाव 31 डिसेंबर रोजी 229433 रुपयांपर्यंत खाली आला. मंगळवारच्या तुलनेत चांदीचा भाव 2896 रुपयांनी कमी झाला.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)