
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चांगलीच वाढ होत आहे. सोन्यासोबतच चांदीच्या भावातही मोठी वाढ झालेली आहे.

दरम्यान, सणासुदीच्या काळात आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली आहे.

आज सोन्याच्या दरात 1100 रूपयांची वाढ झाली आहे. सोन्याचा दर जीएसटी सह 1 लाख 31 हजार 119 रुपयांवर पोहोचला आहे.

काही दिवसांपूर्वी चांदीच्या दरात मात्र मोठी वाढ होत होती. सलग दोन दिवस तब्बल दहा हजार रुपयांपर्यंत वाढ झालेल्या चांदीच्या दरात आज मात्र कुठलीही वाढ झालेली नाही.

साधारण वर्षभरापूर्वी गुंतवणूक केलेले आज मालामाल झाले आहेत. भविष्यातही सोने, चांदीचा भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सामान्यांना दागिने खरेदी करणे अवघड होऊन बसले आहे.