
गेल्या काही दिवसांपासून देशात सोने आणि चांदीचा भाव सतत वाढताना दिसतोय. जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडी याला कारणीभूत ठरत आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा सोन्याचा भाव वाढला आहे.

सोन्यासोबतच चांदीचा भावदेखील आश्चर्यकारकरित्या वाढताना पाहायला मिळतोय. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार चांदीमध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसतायत. सध्या जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दराने इतिहास रचला असून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या दरामध्ये तब्बल साडेचार हजार रुपयांनी वाढ झाली आहे. जळगावच्या इतिहासात पहिल्यांदा चांदीचे दर विना जीएसटी 1 लाख 44 हजार रुपयांवर पोहोचला आहे.

तर चांदीचा दर जीएसटीसह 1 लाख 48 हजार 600 रुपयांवर पोहचला आहे. चांदीसोबतच सोन्याच्या दरातदेखील 400 रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचा दर जीएसटी सह 1 लाख 17 हजार 600 रुपयांवर पोहोचला आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)