Gold Rate : सोनं तब्बल 54,686 रुपयांनी स्वस्त; झाली अशी कमाल की तुम्हालाही वाटेल आश्चर्य; 10 ग्रॅमचा भाव किती?

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव कमी होताना दिसतोय. इराणचे युद्ध सुरू होण्याआदी सोनं सामान्यांच्या अवाक्याच्या बाहेर होते. आता मात्र सोन्यात लक्षणीय घसरण झाली असून, सामान्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

| Updated on: Apr 06, 2026 | 7:40 PM
1 / 5
इराण युद्ध सुरू झाले तेव्हापासून सोन्याच्या भावात सातत्याने घसरण झाली आहे. युद्ध सुरू झाल्याने सोनं महाग होईल असा अंदाज लावला जात होता. परंतु आता सोन्याचा भाव कमी झाला आहे. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने गुंतवणूकदारांनी सोन्याकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे.

2 / 5
दरम्यान, युद्ध सुरू होण्याआधी सोन्याचा भाव खूपच जास्त होता. कधीकाळी सोनं एवढं वधारलं होतं की ते सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं होतं. एमसीएक्सवर सोमवारचा सोन्याचा भाव 1,48,298 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तज्ज्ञांच्या मते भविष्यात सोनं आणखी स्वस्त होऊ शकतं.

3 / 5
आता सोन्याच्या भावाच्या सार्वकालिक उच्चांकावर नजर टाकली तर सोने किती स्वस्त झाले आहे, हे तुम्हाला समजेल. सोन्याचा सार्वकालिक उच्चांक हा 2,02,984 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा आहे. म्हणजेच कधीकाळी सोन्याचा भाव तब्बल 2,02,984 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा होता.

4 / 5
परंतु आता पाहायचे झाल्यास सार्वकालिक उच्चांकाच्या तुलनेत सोनं तब्बल 25 टक्क्यांनी स्वस्त झालं आहे. आकड्यातच सांगायचे झाले तर आपल्या सार्वकालिक उच्चांकाच्या तुलनेत सोनं तब्बल 54,686 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांनी घसरलं आहे.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Follow Us