
तुळशीचं लग्न झालं की लग्नाच मुहूर्त सुरु होतात. लग्न म्हटले की दागिने, कपडे, सजावट हे सर्व आलच. लग्नात वर आणि वधूला तर सोन्याचे नवे दागिने बनवले जातात. पण सध्याच्या सोन्यच्या किंमती पाहाता अनेकांना सोने कसे बनवायचे असा प्रश्न पडतो. पण सध्या सोन्याचे भाव चांगलेच उतरल्याचे दिसत आहे. आज देखील सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आता १० ग्रॅम सोन्याची आजची किंमत किती आहे चला जाणून घेऊया...

आज 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,22,000 रुपये नोंदवली गेली आहे, जी यापूर्वी 1,22,561 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. गेल्या 24 तासांत सोन्याच्या दरात 561 रुपये प्रती 10 ग्रॅमची घट नोंदवली गेली आहे. त्याचप्रमाणे, 22 कॅरेट सोनेही 561 रुपये प्रती 10 ग्रॅमने घसरून 1,11,750 रुपये प्रती 10 ग्रॅमवर आले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाल्यास तेही कमी झाल्याचे दिसत आहे.

एक किलोग्राम चांदीचा भाव घसरून 1,54,000 रुपयांवर आला आहे, जो यापूर्वी 1,54,113 रुपये प्रती किलोग्राम नोंदवला गेला होता. चांदीच्या किंमतीत 113 रुपये प्रती किलोग्रामची घट नोंदवली गेली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या अधिकृत वेबसाइटवर सोने-चांदीच्या किंमती दिवसातून दोनदा अपडेट केल्या जातात. सोने-चांदीच्या किंमती सकाळी एकदा अपडेट झाल्यानंतर संध्याकाळी अपडेट केल्या जातात.

अनेकांना प्रश्न पडतो की सोने आणि चांदीचे दर हे सतत कमी जास्त का होत असतात. सोन्याच्या आणि चांदीच्या देशातील किंमतींवर देशांतर्गत घटकांसोबत जागतिक घटकांचाही मोठा परिणाम होतो. दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरु, चेन्नई, कोलकता आणि इतर काही शहरात सोन्याचे भाव हे थोडे वेगवेगळे असतात. प्रत्येक शहरातील भाव हे फार नाही पण थोडे फार कमी जास्त होत असतात.

ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, जेपी मॉर्गन प्रायव्हेट बँकेचे म्हणणे आहे की 2026 मध्ये सोने 5000 डॉलर प्रती औंसच्या होऊ शकतो. बँकेचे ग्लोबल हेड ऑफ मॅक्रो अँड फिक्स्ड इनकम स्ट्रॅटेजी अॅलेक्स वुल्फ यांच्या मते, 2026 च्या अखेरपर्यंत सोन्याच्या किंमती 5200 ते 5300 डॉलर प्रती औंसपर्यंत वाढ होऊ शकतात. गोल्डमन सॅक्सने डिसेंबर 2026 पर्यंत सोन्याचे 4900 डॉलर प्रती औंसवर पोहोचणार असल्याचे म्हटले जातआहे.