
दिवाळीनंतर लग्नाचा सिझन सुरु होतो. लग्नाच्या वेळी सोने खरेदी केले जाते. अनेकदा नवरीला आहेर म्हणून सोन दिले जाते. पण सध्याचा सोन्याचा भाव हा आकाशाला स्पर्श करताना दिसत आहे. अशातच आज हेच सोन्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे. कारण आज सोन्याचे भाव कमी झाले आहेत.

आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,16,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. ANZ च्या मते पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सोने 4,600 डॉलर प्रति औंस होईल. गोल्डमन सॅक्सने डिसेंबर 2026 पर्यंत सोन्याचे 4,900 डॉलर प्रति औंसवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवला आहे. म्हणजेच साडेचार लाखापेक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे.

सोन्याच्या किंमतीत 15 नोव्हेंबरच्या सकाळी घसरण नोंदवली गेली आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव कमी होऊन 127,180 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. दिल्लीव्यतिरिक्त इतर शहरांमध्येही सोने कोसळले आहे. दुसरीकडे चांदीच्या भावात वाढ कायम आहे. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 127,180 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेटचा भाव 116,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये सोन्याचे भाव कमी झाले आहेत. सध्याच्या काळात मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 116,440 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 127,030 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुणे आणि बेंगलुरू या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट गोल्डची किंमत 127,030 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट गोल्डची किंमत 116,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. काल पेक्षा सोन्याचे दर 1236 कमी झाले आहेत.

ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, जेपी मॉर्गन प्रायव्हेट बँकेचे म्हणणे आहे की २०२६ मध्ये सोने ५,००० डॉलर प्रति औंसच्या पातळीवर पोहोचू शकते. बँकेचे ग्लोबल हेड ऑफ मॅक्रो अँड फिक्स्ड इनकम स्ट्रॅटेजी अॅलेक्स वुल्फ यांच्या मते, २०२६ च्या अखेरपर्यंत सोन्याच्या किंमती $५,२०० ते $५,३०० प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतात. गोल्डमन सॅक्सने डिसेंबर २०२६ पर्यंत सोन्याचे ४,९०० डॉलर प्रति औंसवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवला आहे. ANZ च्या मते पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सोने ४,६०० डॉलर प्रति औंस होईल।

चांदीत दारात वाढ कायम आहे. १५ नोव्हेंबरला ती १,७३,२०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. परदेशी बाजारात चांदीचा स्पॉट भाव घसरून ५२.०३ डॉलर प्रति औंस झाला आहे. सोने आणि चांदीच्या देशातील किंमतींवर देशांतर्गत घटकांसह जागतिक घटकांचाही परिणाम होतो. आज चांदीचे भाव चांदी 1 लाख 58 हजार आहेत. त्यामध्येही 3090 रुपयांची घसरण झाली आहे.