Today’s Gold rate: आता जे लग्नाचे राहिले ते राहिलेच! आजचा भाव ऐकून वरमायही टेन्शनमध्ये, सोन्याच्या भावात मोठी वाढ, 10 ग्रॅमसाठी…

Today's Gold rate: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत वाढ होताना दिसत आहे. आज जो सोन्याचा भाव आहे तो सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारा आहे. जाणून घ्या 10 ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार.

| Updated on: Jan 20, 2026 | 1:59 PM
1 / 5
भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदीच्या दागिन्यांना प्रचंड महत्त्व आहे. एखादा सण असो किंवा आनंदाचा क्षण असो अनेकांच्या गळ्यात सोन्याच्या वस्तू देतात. तसेच आहेरात देखील नववधू आणि वराला सोन्याच्या वस्तू देण्यात येतात. पण सध्या सोन्याच्या भावांनी आकाशाला स्पर्श केला आहे. त्यामुळे सोन्याचे हे नवे भाव सर्वसामान्यांना न परवडणारे आहेत. चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार...

2 / 5
जळगावच्या सराफ बाजारात नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याने दीड लाखांचा तर चांदीच्या दराने केला 3 लाखांचा आकडा पार केला आहे. सुवर्णनगरीत सोन्या आणि चांदीचे दर ऐतिहासिक उच्चाकावर पोहोचले आहेत.

3 / 5
सोन्याच्या दर जीएसटी सह 1 लाख 50 हजार 689 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 3 लाख 17 हजार 240 रुपयांवर पोहोचले आहेत. नवीन वर्षांच्या 20 दिवसात सोन्याचे दर 13 हजार रूपयांनी तर चांदीचे तब्बल 73 हजार रुपयांनी वाढले आहेत. आज सकाळपासून आतापर्यंत सोन्याच्या दरात एकूण अडीच हजार तर चांदीच्या दरात 14 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

4 / 5
विशेष म्हणजे केवळ 38 दिवसांत चांदीमध्ये एक लाख रुपयांची वाढ झाली असून चांदीला 3 लाखांवर पोहोचण्यासाठी अवघे 38 दिवस लागले आहेत. अमेरिका इराण संघर्ष आणि युक्रेन युद्धाच्या वाढत्या व्याप्तीमुळे सोन्या चांदीच्या दारावर परिणाम झाला असून चांदीमध्ये गुंतवणूक वाढल्याचा सराफ व्यावसायिक म्हणाले.

5 / 5
शॉर्टमध्ये पहिल्यांदाच इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोन्या बरोबरच चांदीचे देखील दर वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. वाढत्या दराचा ग्राहकांवर देखील परिणाम झाला असून हौस कशी करावी असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच ग्राहकांचे खरेदी बजेट कोलमडले असल्याचे चित्र आहे.