
जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दराने विक्रमी उच्चांकी गाठली आहे. जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात एकाच दिवसात तब्बल चार हजारांची वाढ झाली आहे.

चांदीच्या किंमतींनी पु्न्हा लाखाचा टप्पा ओलांडला आहे. या नवीन घडामोडीमुळे चांदीचे दर जीएसटीसह १ लाख ०८ हजार १५० रुपयांवर पोहोचले आहेत.

जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच चांदीचे दराने १ लाख ८ हजारांचा आकडा पार केला आहे.

दुसरीकडे सोन्याच्या दरात ७०० रुपयांची घसरण होऊन सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ४२५ रुपयांवर खाली आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे

रशिया-युक्रेन यांच्या गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या युद्धामुळे सोने-चांदीच्या दरात वाढ व घट होत आहे, असल्याचं सराफ व्यवसायिकांचं म्हणणं आहे

गुडरिर्टन्सनुसार, सोन्याच्या दरात ८२० रुपयांची वाढ झाली आहे. आता २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,५५० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ९०,३५० रुपये इतकी आहे