Gold Future Rate : सोनं तब्बल 2 लाख, चांदी थेट 3 लाखांवर, भाव पाहून सामान्यांच्या मनात धडकी; वर्षभरात…

गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात वाढ होत आहे. लवकरच सोनं दोन लाखांच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

| Updated on: Jan 11, 2026 | 4:29 PM
1 / 5
गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 2025 सालात तर या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत तुफान वाढली. आता नव्या वर्षातही सोन्याचा भाव वाढतानाच दिसतोय. त्यामुळेच वर्षभरात सोनं वाढणार तरी किती? असा प्रश्न विचारला जातोय.

2 / 5
सध्याची स्थिती पाहता वर्षभरात सोन्याच भाव खूपच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने आणि चांदी हा चांगला पर्याय असल्याचे म्हटले जात आहे. 2025 या सालात सोन्याने तब्बल 66 टक्क्यांनी रिटर्न्स दिलेले आहेत.

3 / 5
तर चांदीने वर्षभरात 171 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. तज्ज्ञांच्या मते आगामी काळात सोनं आंतरराष्ट्रीय बाजारात 5000 डॉलर प्रति औंसवर जाण्याची शक्यता आहे. भारतीय रुपयांत सांगायचे झाल्यास सोन्याचा भाव भविष्यात 1.70 लाख रुपये ते 2 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

4 / 5
चांदीचा भावदेखील भविष्यात 100 डॉलर्स प्रति औंसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच चांदीचा भाव 2.8 लाख रुपये ते 3.3 लाख रुपये प्रति किलोवर जाऊ शकतो. त्यामुळे भविष्यात सोने आणि चांदीमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)