सोन्याचा भाव म्हणजे दुसरं रॉकेट, एका दिवसात थेट…सामान्यांनी लावला डोक्याला हात, नवा भाव काय?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात चढउतार होत आहे. सध्या सोन्याचा भाव चांगलाच वधारला आहे. सोबतच चांदीदेखील चकाकली असून सामान्यांना झळ बसणार आहे.

| Updated on: Dec 15, 2025 | 9:27 PM
1 / 5
गेल्या अनेक दिवासांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. कधी सोन्याचा भाव गगनाला भिडतोय. तर कधी लगेच हा भाव कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. चांदीचा भावदेखील अशाच प्रकारे कमी-जास्त होत आहे.

2 / 5
सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार 300 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता सामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.

3 / 5
दुसरीकडे चांदीच्या दरातही तब्बल 3 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. या भाववाढीसह सोन्याचा दर 1 लाख 36 हजार 784 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर 1 लाख 96 हजार 730 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

4 / 5
सोन्या चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे. अलिकडच्या काळातील जागतिक परिस्थिती, जागतिक बाजारातील चढ-उतार, भारतीय सराफा बाजारातील उलाढाल आणि रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये केलेली कपात यामुळे सध्या सराफा बाजारात चढउतार झालेला पाहायला मिळत आहे.

5 / 5
सोन्याचा भाव अशा प्रकारे वाढताना पाहायला मिळत असल्याचे भविष्यात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव किती उचांवणार असे सामान्यांकडून विचारले जात आहे. भविष्यात हा भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.