
सध्या सोने आणि चांदी या दोने मौल्यवान धातूंचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या सणासुदीच्या काळात तर सोन्यामध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव चांगलाच वाढलेला आहे.

शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात सलग पाचव्या दिवशी तेजी नोंदवल गेली. शुक्रवारी सोन्याचा भाव 1.23 टक्क्यांनी वाढून 4,379.93 डॉलर्सपर्यंत पोहोचला.

हीच बाब लक्षात घेऊन अर्थशास्त्रज्ञ पीटर शिफ यांनी एका आठवड्यात सोन्याचा भाव 10 टक्क्यांनी वाढल्यामुळे भविष्यात बाजारात मोठी उलथापालथ होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. शिफ हे युरो पॅसिफिक असेट मॅनेजमेंटचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि जागतिक रणनीतिकार आहेत.

शिफ यांनी भविष्यात सोने, चांदीच्या बाराजात काहीतरी मोठं होण्याची शक्या व्यक्त केली आहे. सध्या सोन्याचा भाव 4,370 डॉलर्सवर आहे. एका आठवड्याच्या आत सोने 10 टक्क्यांनी वाढले असेल तर जगात काहीतरी मोठी उलथापालथ होण्याचे यातून संकेत मिळतात, असे शिफ यांनी म्हटले आहे.

सध्या जगात आर्थिक अस्थिरता आहे. अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्माण केलेल्या व्यापार अनिश्चिततेमुळे सध्या गुंतवणूकदार सोने, चांदी या विश्वासार्ह गुंतवणुकीकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्याचा भाव वाढताना दिसतोय.

सध्या जगभरात सोन्याचा भाव वाढत आहे. त्याचा परिणाम भारतावरही दिसतोय. भारतात दिवाळीच्या अगोदर देशांतर्गत सोन्याची किंमत रेकॉर्डब्रेक उच्चांकावर पोहोचली. या वर्षी सोन्याच्या भावात साधारण 70 टक्के वाढ नोंदवली गेली. त्यामुळेच आता भविष्यातही सोने, चांदीचा भाव असाच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)