
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोन्याचा भाव लवकरच दीड लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता सामान्यांना दिसाला मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सध्या सोन्याचा भाव घसरला आहे. सोन्याचा भाव कमी झाल्याने आता सामान्यांची त्यांची दागिने तयार करण्याची हौस पूर्ण होऊ शकते. प्रत्येक 100 ग्रॅममागे सोन तब्बल 8200 रुपयांनी कमी झालं आहे.

24 कॅरेट सोन्याचा विचार करायचा झाल्यास एक ग्रॅम सोन 82 रुपयांनी कमी झालं असून सध्या एक ग्रॅम सोन्याचा भाव 14,318 रुपये झाला आहे. 14 जानेवारी रोजी हाच भाव 14,400 रुपये होता. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,43,180 रुपयांवर पोहोचला आहे.

24 कॅरोट सोन्याचा 14 जानेवारी रोजी हा भाव 1,44,000 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये होता. म्हणजेच कालच्या तुलनेत आज सोने 820 रुपयांनी कमी झाले आहे. 100 ग्रॅम सोन्याचा विचार करायचा झाल्यास आजचा भाव 14,31,800 रुपये आहे. कालच्या तुलनेत हा भाव 8200 रुपयांनी कमी आहे.

22 कॅरेट सोन्याचा भावही कमी झाला आहे. 1 ग्रॅम सोने 13,125 रुपयांपर्यंत खाली आले आहे. 14 जानेवारी रोजी हा भाव 13,200 रुपये होता. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,31,250 रुपयांपर्यंत कमी झाला आहे. हाच भाव 14 जानेवारी रोजी 1,32,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.