
आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे कपडे पाहिले असतील. काही ड्रेस पाहून तर तुम्ही अचंबितही झाले असाल. सध्या मात्र अशाच एका आगळ्यावेगळ्या सोन्याच्या ड्रेसची चर्चा होत आहे. या ड्रेसने एक नवा रेकॉर्ड स्थापित केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेला हा जगातील सर्वात महागडा ड्रेस आहे. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड डेकॉर्डने घेतली आहे. या ड्रेसला दुबई ड्रेस म्हटले जाते. शारजाह येथे आयोजित केलेल्या एक्स्पो सेंटरमध्ये हा ड्रेस लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार या ड्रेसचे वजन तब्बल 10 किलोंपेक्षाही जास्त आहे. 21 कॅरेट सोन्याचा उपयोग करून हा ड्रेस तयार करण्यात आला आहे. अल रोमाइजान गोल्ड अँड ज्वेलरी नावाच्या कंपनीने हा डेस तयार केलेला आहे.

या ड्रेसचे वजन तब्बल 10.0812 किलो आहे. भारतीय रुपयांत सांगायचे झाल्यास या ड्रेसची किंमत तब्ल 11 कोटी रुपये आहे. हा ड्रेस तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे महागडे जेमस्टोन वापरलेले आहेत. ड्रेस तयार करण्यासाठी तब्बल 980 तास लागलेले आहेत.

एकूण चार भागांमध्ये हा ड्रेस तयार करण्यात आलेला आहे. यात 398 ग्रॅमचा गोल्डन क्राऊन आहे. तर 8,810.60 ग्रॅमचा स्टेटमेंट नेकलेस आहे. 134.1 ग्रॅमचे इअररिंग्स आणि 738.5 ग्रॅमचे गोल्ड पीसचा समावेश आहे.