
अभिनेता सुयश टिळक हा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होत असतो. मात्र आता अचानक सुयशनं सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय.

इन्स्टाग्रामवर खलील जिब्रानचं एक कोट पोस्ट करत सुयशनं हा निर्णय चाहत्यांना सांगितला आहे.

एवढंच नाही तर इन्स्टाग्राम स्टोरीमध्येही त्यानं ‘Offline is the new luxury’ असा मॅसेज शेअर केला आहे.

सुयश उत्तम फोटोग्राफर आहे, त्यामुळे त्यानं स्वत: क्लिक केलेल्या काही फोटोंवर कोट्स लिहत त्यानं ते शेअर केले आहेत.

सुयश सध्या ‘शुभमंगल सावधान’ या मालिकेत शंतनूची भूमिका साकारतोय. नुकतंच त्यानं बॉलिवूड चित्रपट ‘खाली-पीली’मध्येसुद्धा दमदार अभिनय केला.
