
बॉलिवूड अभिनेता गोविंदा केवळ त्याच्या अभिनयासाठीच नाही तर त्याच्या नृत्यासाठी ओळखला जातो.सोबतच गोविंदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही कायमम चर्चेत असतो. गोविंदाने त्याच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याने त्याच्या घरालाही एखाद्या राजवाड्यासारखंच सजवलं आहे. चला तर मग गोविंदाच्या घराची सफर करूया.

गोविंदाचे घर आतून एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. त्याच्या घराचा प्रत्येक कोपरा वास्तुनुसार बांधलेला आहे. गोविंदाच्या घरात तुम्हाला सर्वत्र पांढराच रंग दिसेल. जो राजवाड्यासारखा अनुभव देतो. त्याच्या घरातील फर्निचरही पांढऱ्या रंगाचे आहे.

घराची बाल्कनी बरीच मोठी आहे. बाल्कनीतून मुंबईचे एक विहंगम दृश्य पाहता येईल. गोविंदाच्या पत्नीने म्हणजे सुनीताने एक खास बाल्कनी बनवली आहे जिथे ती तुळस ठेवते आणि त्यांनी एका मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे कोणाच्याही वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी दररोज तिथे दिवा लावते.

गोविंदाच्या घराचा हॉल खूप सुंदर आहे. त्याची पत्नी सुनीताने हॉलसाठी पिवळ्या रंगाचे दोन आसनी सोफा निवडले आहेत. यासोबतच त्या समोर एक गोंडस सेंटर टेबल ठेवले आहे. याशिवाय हॉलमध्ये एक मोठा हिरव्या रंगाचा गोल सोफा देखील ठेवण्यात आला आहे.

गोविंदाच्या घराच्या एका कोपऱ्यात एक अतिशय सुंदर बार सेक्शन आहे, जो त्याचा मुलगा हर्षवर्धनने खास डिझाइन केला आहे. हा कोपरा सुनीताचा आवडता आहे असं ती म्हणते.

गोविंदच्या घराचा प्रत्येक कोपरा तुम्हाला प्राचीन वस्तूंनी सजवलेला आढळेल.

गोविंदाच्या घराचे डाईनिंग एरिआत ठेवलेलं टेबल हे सोनेरी टेबल असून त्यासमोर वेगळ्या पद्धतीच्या खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. जेवणाच्या ठिकाणी सुंदर पडदे देखील बसवण्यात आले आहेत. या भागात लाकडी फरशी तसेच आरशाच्या खिडक्या देखील आहेत.

गोविंदा आणि सुनीता आहुजाची बेडरूम खूपच अनोखी आहे. त्यांचा पलंग खूप मोठा असून तो आलिशान अनुभव देतो. बेडसाठी पांढऱ्या रंगाची बेडशीट आणि उशी देखील निवडण्यात आली आहे.

गोविंदाच्या घरात एक अतिशय सुंदर मंदिर आहे, जे त्याच्या आईने बांधले आहे. सुनीता या मंदिरात बसून दररोज सुमारे दीड तास पूजा करते. तिला पूजा करायलाही फार आवडते.