Govinda: अरे ही मराठी नाही तर…कोमल राणी नेमकी कुठची? जिच्यासोबत रंगल्यात गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा
बॉलिवूड अभिनेता गोविंदा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे गोविंदाच्या कमबॅकची चर्चा होताना दिसते तर दुसरीकडे त्याच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत.

दरम्यान गोविंदा 37 वर्षांच्या एका तरुणीसोबत एअरपॉर्टवर स्पॉट झाला. ती तरुणी कोमल राणी स्वर्णकार असल्याचे म्हटले जात आहे. गोविंदा आणि कोमलचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

कोमल ही एक स्ट्रगलर अभिनेत्री आहेत अशी माहिती समोर आली आहे. कोमलला राणी स्वर्णकार या नावानंही ओळखलं जाते. ती गोविंदासोबत अनेकदा सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे.

कोमल बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. गोविंदाच्या आगामी 'रूपा' चित्रपटाशी नाव जोडण्यापूर्वी प्रेक्षक तिला फारसे ओळखत नव्हते. याच सिनेमातून गोविंदा 7 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार असल्याचे म्हटले जात आहे.

मूळची उत्तर प्रदेशची असलेली कोमल हिंदी सिनेमात नवीन असली तरी, गोविंदासोबत जोडल्या गेल्याने ती सध्या चर्चेत आहे. सुरुवातीला ती मराठी असल्याचे म्हटले जात होते, पण आता हा दावा खोटा असल्याचा म्हटला जात आहे.