
ग्रहांचे राशीपरिवर्तन आणि नक्षत्रगोचर यामुळे सर्व राशींच्या जातकांवर परिणाम होतो. सध्या देवगुरू बृहस्पती वक्री अवस्थेत आहेत आणि 5 डिसेंबर 2025 रोजी ते राशी बदलणार आहेत. वक्री गुरूंचे राशीपरिवर्तन अनेक राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. गुरू कर्क राशीतून मागे फिरत मिथुन राशीत प्रवेश करतील. गुरूंचा मिथुन राशीतील प्रवेश ‘या’ 3 राशींचे नशीब चमकवणार आहे. यांना भाग्याची साथ मिळेल. कोणत्या राशींना शुभ फळ मिळेल, पाहूया.

वक्री गुरूंचे राशीपरिवर्तन सिंह राशीच्या जातकांसाठी खूप शुभ आहे. तुमच्या ११व्या भावात गुरू गोचर करणार आहेत. उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील आणि मोठा आर्थिक लाभ होईल. जुनी मनोकामना पूर्ण होईल, मान-सन्मान वाढेल. करिअरमध्ये प्रगती होईल. प्रवासाचे योग येतील आणि गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळेल.

तुळ राशीवाल्यांसाठी गुरूंची वक्री चाल अत्यंत शुभ ठरणार आहे. तुमच्या 9व्या भावात (भाग्यस्थान) गुरू गोचर करतील. यामुळे भाग्याची साथ मिळेल. वडील आणि गुरूंचे सहकार्य मिळेल, आध्यात्मिक रुची वाढेल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल, सहकाऱ्यांकडून कौतुक होईल. आयुष्य सुखमय राहील.

धनु राशीच्या 7व्या भावात गुरूंचा गोचर होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक राहील. अविवाहितांना लग्नाचे योग येतील. विवाहितांचे दांपत्यजीवन सुखद राहील. नोकरीत बदली होऊ शकते. पार्टनरशिपमध्ये चांगला नफा मिळेल. व्यवसायात प्रगती आणि भरघोस कमाईचे योग आहेत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)