उन्हाळ्यात कच्ची हिरवी मिरची खाल्ल्याने खरंच उष्माघात टळतो? सत्य आले समोर

हिरवी मिरची आणि लाल मिरची यांपैकी आरोग्यासाठी कोणती जास्त फायदेशीर आहे? उन्हाळ्यात हिरवी मिरची खाल्ल्याने उष्माघातापासून खरोखरच बचाव होतो का? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक सत्य

| Updated on: May 26, 2026 | 3:58 PM
1 / 8
भारतीय स्वयंपाकघरात मिरच्यांशिवाय जेवणाची चवच अपूर्ण आहे. भाजीला तिखटपणा आणण्यापासून ते लोणची, चटण्या आणि सॅलडची चव वाढवण्यापर्यंत मिरचीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. लाल मिरचीपेक्षा हिरवी मिरची आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते, असे म्हटले जाते. पण आरोग्यासाठी हिरवी मिरची की लाल मिरची कोणती खावी हे कळत नाही, आज आपण त्याबद्दल जाणून घेऊया.

2 / 8
हिरवी मिरची ताजी असतानाच खाल्ली जाते, तर लाल मिरची सामान्यतः सुकवून वापरली जाते. याच कारणामुळे या दोन्हींच्या पोषक घटकांमध्ये लक्षणीय फरक आढळतो. हिरव्या मिरचीत व्हिटॅमिन सी आणि कॅप्सायसिन (Capsaicin) चे प्रमाण भरपूर असते. व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते, तर कॅप्सायसिन पचनक्रिया सक्रिय ठेवण्यास मदत करते.

3 / 8
संशोधनानुसार, हिरवी मिरची सुकवल्यानंतर त्यातील 'एस्कॉर्बिक ॲसिड' (व्हिटॅमिन सी) मोठ्या प्रमाणात नष्ट होते. मात्र, लाल मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते, जे डोळे आणि त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

4 / 8
जर तुम्हाला 'व्हिटॅमिन सी' हवे असेल तर हिरवी मिरची उत्तम आणि जर 'व्हिटॅमिन ए' ची गरज असेल तर लाल मिरची फायदेशीर ठरते. हिरव्या आणि लाल दोन्ही प्रकारच्या मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन बी ६, पोटॅशियम, तांबे (कॉपर) आणि अनेक जैवक्रियाशील वनस्पती संयुगे (Bioactive plant compounds) असतात.

5 / 8
या दोन्हीही मिरच्या शरीरातील अंतर्गत सूज (Inflammation) कमी करण्यास मदत करतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यात मदत होते. मेटाबॉलिझ्म सुधारून वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. तसेच कॅप्सायसिनमधील सूक्ष्मजीवविरोधी (Anti-microbial) गुणधर्म हानिकारक जीवाणूंपासून शरीराचे रक्षण करतात.

6 / 8
उन्हाळ्यात कच्ची हिरवी मिरची खाल्ल्याने उष्माघात (Heat stroke) होत नाही, असा एक पारंपरिक समज आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर हिरव्या मिरचीमधील कॅप्सायसिन आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि पचनसंस्थेतील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करते.

7 / 8
उन्हाळ्यात तीव्र उष्णतेमुळे पचनक्रिया मंदावते. अशा वेळी मर्यादित प्रमाणात हिरवी मिरची खाल्ल्याने पचनक्रिया सक्रिय राहते. यामुळे शरीराला उष्णतेचा सामना करण्याची ताकद मिळते. तसेच उष्माघाताच्या काही लक्षणांपासून अप्रत्यक्षपणे संरक्षण होऊ शकते.

8 / 8
मिरची ही शरीरासाठी फायदेशीर असली तरी तिचे अतिसेवन शरीराला त्रासदायक ठरू शकते. जास्त तिखट किंवा मसालेदार खाण्यामुळे आम्लपित्त (Acidity), पोटात जळजळ आणि पचनाचे गंभीर विकार उद्भवू शकतात. त्यामुळे शरीराची गरज आणि ऋतूचा विचार करून दोन्ही मिरच्यांचा आहारात योग्य प्रमाणातच वापर करावा.

Follow Us