गुढी उभारू आनंदाची,समृद्धीची आणि आरोग्याची…, अनेक ठिकाणी शोभायात्रांचा उत्साह

साडे तीन शुभ मुहूर्त पैकी आजचा एक मुहूर्त आणि मराठी नवीन वर्षाचा दिवस असल्याने राज्यात सध्या गुढीपाडव्याचा उत्साह पहायला मिळत आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी शोभायात्रांचा उत्साह पाहायला मिळत आहे. शिवाय नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांचा उत्साह पाहायला मिळत आहे.

| Updated on: Mar 30, 2025 | 12:37 PM
1 / 7
 राज्यात मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुढीपाडवा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने गिरगाव, ठाणे, डोंबिवली यांसह विविध परिसरात शोभायात्रा काढल्या जात आहेत.

2 / 7
तसेच यानिमित्ताने महाराष्ट्रात सर्वत्र गुढी उभारुन, गोडाधोडाचे पदार्थ करुन नवीन वर्षाचा आनंद साजरा केला जात आहे. सध्या सर्वत्र चैतन्यमय वातावरण असते.

3 / 7
 पारंपरिक वेशभूषा करून महिला, तरुण लहान मुलं शोभायात्रेत सहभागी झाले. सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. मर्दानी खेळ, फुगड्या खेळत मोठ्या जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली.

4 / 7
गुढीपाडव्यानिमित्त सुरु होणाऱ्या मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी आज पहाटेपासूनच अनेक कार्यक्रमही घेतले जात आहेत.

5 / 7
पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रा, गाण्यांच्या मैफीली, बाईक रॅली आणि इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केले जात आहेत.

6 / 7
या ठिकाणी प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी काढलेल्या शोभायात्रेत मराठी माध्यमांच्या या मुलांनी धम्माल करत या मराठीमोळ्या सणाचे महत्व जपण्याचा प्रयत्न केला.

7 / 7
गुढीपाडव्याच्या खास प्रसंगी सर्वांनी ढोल-ताश्यांच्या गजरात  नववर्षाचं स्वागत केलं आहे. ठाकरेगटाचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील आनंद लुटला.