
लातूर जिल्ह्यातल्या भडी इथं एक विचित्र घटना घडली आहे. येथे आलेल्या पावसामुळे ओढ्याला आलेल्या पाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आलेला मृतदेह वाहून गेल्याची घटना घडली आहे. स्मशानभूमी नसल्याने हा प्रकार घडला आहे.

ऋतिक कांबळे या 20 वर्षीय बांधकाम मजुराचा मृत्यू झाला होता. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. विद्युत शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता.

मात्र त्या भागात मोठा पाऊस झाल्याने हा मृतदेह अर्धवट जळाला आणि पाण्यात वाहून गेला. वाहून जात असलेल्या मृतदेहाचे कुत्रे लचके तोडत होते. मृतदेहावरचे मांस खात होते.

दरम्यान, कुत्रे मृतदेहाचे लचके तोडत असल्याचे काही युवकांनी पाहिले आणि अर्धवट जळालेला मृतदेह पाण्याबाहेर आणून पुन्हा अंत्यसंस्कार केले.

गावात स्मशानभूमी नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात.