‘हनुमान अंश’ चित्रपट लवकरच OTT वर येणार, या दिवशी होणार रिलीज, जाणून घ्या तारिख
गेल्या 3 महिन्यांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा विशाल चतुर्वेदी यांचा हनुमान अंश हा चित्रपट आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहेत. लवकरच तो या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.

विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित आणि नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर करत त्याच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट सोनी लिव्ह (Sony LIV) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
‘हनुमान अंश’ हा चित्रपट 7 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. सुरुवातीला चित्रपटाची कमाई संथ होती; मात्र तिसऱ्या आठवड्यापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली. विशेष म्हणजे, जवळपास तीन महिने हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होता.
अवघ्या 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे 453 कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षातील सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या चित्रपटांमध्ये त्याचा समावेश झाला आहे.
या चित्रपटाची कथा नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित असून, ‘डिव्हाइन डिटूर : दॅट चेंज्ड माय लाइफ’ या पुस्तकापासून प्रेरित आहे. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विशाल चतुर्वेदी यांनी केली आहे. ‘स्वयंभू मीडिया नेटवर्क’ या बॅनरअंतर्गत चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
आता चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळवल्यानंतर ‘हनुमान अंश’ ओटीटीवर येत आहे. त्यामुळे ज्यांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नाही, त्यांना घरबसल्या 27 नोव्हेंबरपासून सोनी लिव्हवर हा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.