
आज अभिनेता कमल हसन यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री श्रुती हसननं वडिलांना खास गिफ्ट दिलं आहे.

श्रुतीनं वडिलांसोबत एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

फोटोमध्ये श्रुती वडील कमल हसन यांच्या कडेवर बसलेली आहे.

या पोस्टसोबत तिनं 'हॅपी बर्थडे बापूजी, अप्पा, डैडी हे वर्ष तुमच्यासाठी अविस्मर्णीय राहो'. असं कॅप्शन दिलं आहे.

या फोटोमध्ये लहाणगी श्रुती आणि कमल हसन यांच्यातील बॉन्डिंग बघायला मिळत आहे.