
नेहमीच आपल्या वेगळेपणासाठी आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत आज तिचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. ती नेहमीच वादात असते. त्यामुळे वाद आणि राखी सावंत असं समीकरणच झाल्यासारखं आहे. तिच्या भोवतीच्या वादांवर टाकलेला हा दृष्टीक्षेप.

लवकरच पॉर्न आर्टिस्ट बनणार : अभिनेत्री सनी लिओनीची मुलाखत घेताना एका ज्येष्ठ पत्रकाराने तिचा अपमान केला होता. त्यावेळी संपूर्ण बॉलिवूडनं सनीला पाठिंबा दिला होता. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खाननंही सनी लिओनीला पाठिंबा देत सनीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत राखी सावंतला तिचं मत विचारलं असता ती म्हणाली, 'ऐका, माझ्याकडे आणखी एक चांगली बातमी आहे… राखी सावंत लवकरच एक पॉर्न स्टार बनणार आहे.'

चॅनलवर मतांची छेडछाड केल्याचा आरोप : राखी बऱ्याच रिअॅलिटी शोचा भाग होती. 'बिग बॉस' आणि 'नच बलिये'च्या माध्यमातून ती जास्त चर्चेत आली. 'नच बलिये'मध्ये तिनं चॅनलवर तिची वक्तव्य मॉर्फ करून दाखवल्याचा आरोप केला होता.

कंगना रनौतबद्दल वक्तव्य : राखीच्या टीकेतून अभिनेत्री कंगना रनौतही वाचली नाही. कंगनानं 2011 मध्ये मिका सिंगला किस करणास नकार दिला होता. सोबतच असं करायला मी काही राखी सावंत नाही असं वादग्रस्त वक्तव्य तिनं केलं होतं. त्यावेळी राखीनं कंगनाला खडे बोल सुनावले होते.

पाकिस्तानच्या झेंड्यासोबत फोटो : काही दिवसांपूर्वी राखीनं पाकिस्तानच्या झेंड्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.