
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिने अनेक सिनेमांमध्ये छोट्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. राखील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. पण राखीने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

रिपोर्टनुसार, राखी सावंत हिची नेटवर्थ 37 कोटी रुपये आहे. शिवाय मुंबईत राखीचं स्वतःचं घर देखील आहे. राखी रिऍलिटी शोच्या माध्यमातून कमाई करते.

राखी सावंत

एकदा राखीला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा राखी पापाराझींना म्हणाली, ‘दुबई याठिकाणी राखी सावंत हिची अकॅडमी सुरु झाली आहे. दुबईमध्ये मी आणखी एक घर देखील घेतलं आहे. एक नवी गाडी देखील घेतली आहे..’

सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या राखीकडे बॉलिवूडमध्ये कोणतंही काम नाही, तरी देखील ड्रामा क्विन कोट्यवधींची माया कमावतेय.