‘माय लव्ह’, Hardik Pandya ची बायको नताशाचा हॉट, रोमँटिक, घायाळ करणारा अंदाज
भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पंड्याच्या आयुष्यात त्याची पत्नी नताशा स्टानकोविचच स्थान खूप महत्त्वाचं आहे. तो तिच्यावर खूप प्रेम करतो.

भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पंड्याच्या आयुष्यात त्याची पत्नी नताशा स्टानकोविचच स्थान खूप महत्त्वाचं आहे. तो तिच्यावर खूप प्रेम करतो. सोशल मीडियावरुन हार्दिक पत्नीबद्दलच प्रेम बरेचदा व्यक्तही करतो. हार्दिकने पुन्हा एकदा पत्नीसाठी प्रेमाची पोस्ट केली आहे.

हार्दिकने इन्स्टाग्रामवर नताशा सोबतचे आपले काही फोटो शेयर केले आहेत. त्यात दोघेही खूप रोमँटिक मूड मध्ये दिसतायत. काही फोटोंमध्ये नताशा एकटी सुद्धा दिसतेय.

हार्दिकने पोस्ट केलेले फोटो ग्रीस व्हॅकेशनचे आहेत. हार्दिक अलीकडेच सुट्टया घालवण्यासाठी कुटुंबासोबत ग्रीसला गेला होता. तिथे त्याने बराच वेळ कुटुंबासोबत घालवला.

हार्दिक आता बंगळुरु मध्ये दाखल झालाय. हार्दिक आशिया कपसाठी निवडल्या गेलेल्या संघाचा भाग आहे. स्पर्धेसाठी संपूर्ण भारतीय संघ 23 ऑगस्टला यूएईला रवाना होईल.

सन 2020 मध्ये हार्दिकने नताशा स्टानकोविचला लग्नसाठी प्रपोज केलं. काही महिन्यात त्यांनी लग्न उरकलं. ऑगस्ट महिन्यात दोघे आई-बाबा बनले. त्यांनी मुलाचं नाव अगस्त्य ठेवलं.