हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा करणार लग्न? गर्लफ्रेंड माहिका बनणार अगस्त्यची सावत्र आई?
घटस्फोटाच्या जवळपास दोन वर्षांनंतर क्रिकेटर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा लग्न करण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. गर्लफ्रेंड माहिका शर्माशी तो दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

क्रिकेटर हार्दिक पांड्या सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून तो मॉडेल माहिका शर्माला डेट करतोय. हे दोघं उघडपणे एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करताना दिसतात. आयपीएलदरम्यानही या दोघांची केमिस्ट्री पहायला मिळाली होती. आता लवकरच हार्दिक आणि माहिका लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय.

हार्दिकने दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. गर्लफ्रेंड माहिकासोबत तो उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. इतकंच नव्हे तर या लग्नाची तारीखसुद्धा निश्चित झाल्याचं कळतंय. येत्या 22 मे हार्दिक आणि माहिका लग्नबंधनात अडकणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय.

या लग्नसोहळ्याला फक्त मोजकेच पाहुणे उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चर्चांवर अद्यार हार्दिक किंवा माहिकाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. हार्दिक आणि माहिका 2025 पासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनी आपलं नातं जाहीर केल्यापासून सोशल मीडियावर आणि सार्वजनिक ठिकाणीही ते उघडपणे प्रेम व्यक्त करताना दिसले.

क्रिकेट मॅचदरम्यान माहिका अनेकदा बॉयफ्रेंड हार्दिक पांड्यासाठी चिअर करताना दिसली. तर हार्दिक आणि नताशा यांच्या मुलासोबतही ती अनेकदा दिसायची. हार्दिकने 2020 मध्ये मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविकशी लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांतच हे दोघं विभक्त झाले. 2024 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर मुलगा अगस्त्यचा सांभाळ दोघं मिळून करत आहेत.

माहिका शर्मा ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने सब्यसाची, मनिष मल्होत्रा यांसारख्या मोठमोठ्या डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला आहे. इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये तिने 'मॉडेल ऑफ द इअर'चाही किताब जिंकला आहे. याशिवाय तिने विविध म्युझिक व्हिडीओजमध्येही काम केलंय. इन्स्टाग्रामवर माहिकाचे सात लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.