
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता रोहित माने याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

रोहित याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रोहित याने स्वतःचं घर घेतलं आहे. अतिशय सुंदर असं अभिनेत्याने स्वतःचं घर सजवलं आहे.

घराचा व्हिडीओ पोस्ट अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. शिवाय लक्षवेधी असं कॅप्शन देखील दिलं आहे. रोहित याच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहे.

नव्या घराचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर अभिनेता भावना व्यक्त करत म्हणाला, 'आमच्या स्वप्नांच्या प्रवासाची सुरुवात म्हणजे हे घर आहे. ही वास्तू आहे. आमच्या प्रवासाची सुरवात जर एवढी गोड आहे तर पुढचा प्रवास हा अजूनच सुंदर असणार आहे. पुढच्या प्रवासासाठी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम सोबत असू द्या '

खास अंदाजात अभिनेत्याने घर सजवलं आहे. व्हाईट थीममुळे अभिनेत्याचं घर अधिक प्रशस्त वाटतं आणि निळ्या फर्निचरने त्याला एक वेगळाच उठाव मिळालाय.