Heart Tests: चाळिशीनंतर Heart Attack पासून वाचण्यासाठी 3 टेस्ट करा, आरोग्य तज्ज्ञाचा महत्वाचा सल्ला
Heart Tests: चाळिशी ओलांडलेल्या व्यक्तींनी Heart Attack पासून वाचण्यासाठी 3 टेस्ट करायला पाहिजे. या टेस्ट आरोग्य क्षेत्रातील जाणकार, तज्ञ्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केल्या पाहिजे.

धावपळीच्या जीवनशैलीत चाळीशी ओलांडलेल्या व्यक्तींना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावं लागत आहे. अनेकांना हृदय विकाराचे झटके देखील येतात. हृदय विकाराचा झटका आल्यानंतर स्थिती गंभीर होते. त्यामुळे 3 टेस्ट करायला हव्यात.
चाळिशी पार केलेल्या व्यक्तींनी कमीत कमी ब्लड प्रेशर तपासून घेतलं पाहिजे. उच्च रक्तदाब हा हृदयविकारासाठी धोकादायक मानला जातो. रक्तदाबाचा त्रास वाढल्यास सायलंट किलर ठरू शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तीन महिन्यातून एकदा ब्लड प्रेशर तपासलं पाहिजे.
लिपीड प्रोफाइल टेस्ट देखील केली पाहिजे. या टेस्टद्वारे शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण तपासलं पाहिजे. शरीरात वाढलेल्या खराब कोलेस्ट्रॉलकडे दुर्लक्षित करू नये. कॉलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयाच्या धमन्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते.
रक्तातील साखरेच्या प्रमाणाची चाचणी केली पाहिजे. मधुमेहाचा संबंध थेट हृदयरोगाशी येतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास त्याचे रूपांतर मधुमेहात होते. त्यामुळे आहारात योग्य बदल, नियमित व्यायाम, वजन नियंत्रित करावे.
तुमच्या कुटुंबात आई-वडील किंवा जवळच्या नातेवाईकांना हृदयरोग असेल. असावेळी सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यात तुम्ही तंबाखू किंवा धूम्रपाण, झोपेचे अभाव, मद्यपानामुळे हृदयाचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.