
नेपाळमध्ये रविवारी 'तारा एअरलाइन्स' चं ट्विन इंजिन '9 NAET' विमान कोसळून मोठा अपघाताची घटना घडली आहे. या घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे फोटो समोर आले आहे.

नेपाळ लष्कराने विमानाचा संपर्क तुटल्यानंतर शोध मोहिमेला सुरुवात केली. मात्र सातत्याने होता असलेल्या बर्फवृष्टीमुळे शोध मोहीमकाही वेळ थांबवावी लागली होती. त्यानंतर पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली.

लष्करानं दिलेल्या माहिती नुसार लष्कराच्या बचाव पथअपघातग्रस्त 'तारा एअर' विमानाचे अवशेष मुस्तांग जिल्ह्यातील थासांग-2 च्या सनोसवेअरमध्ये दुर्घटना ग्रस्त विमानाचे अवशेष सापडले आहेत.

नेपाळचे पोलीस निरीक्षक राज कुमार तमांग यांच्या नेतृत्वाखालील पथक विमानानं अपघातस्थळी पोहोचलं आहे. या दुर्घटनेत चार भारतीय, दोन जर्मन आणि 13 नेपाळी नागरिकांसह एकूण 22 लोक विमानात होते.

नेपाळचे पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली काही प्रवाशांचे मृतदेह ओळखता येत नाहीत. पोलीस अवशेष गोळा करत आहेत.

स्थानिक लोकांनी नेपाळ लष्कराला दिलेल्या माहितीनुसार, तारा एअरचे विमान मानपती हिमाल भूस्खलनात लमचे नदीच्या जवळ कोसळले
