दिसण्यावर जाऊ नका! बाईक रायडर्सने योग्य हेल्मेट कसे निवडावे? 4 गोष्टी नक्की तपासा

नवीन हेल्मेट खरेदी करताना केवळ लूक न बघता सुरक्षिततेची खात्री कशी करावी? ISI मार्क, व्हिझर आणि आरामदायक फिटिंगसह सर्वोत्तम हेल्मेट निवडण्यासाठीच्या खास टिप्स आणि नियम या लेखात वाचा.

| Updated on: May 24, 2026 | 2:53 PM
1 / 6
स्पीडमध्ये बाईक चालवणे हे जितके रोमांचक आहे, तितकेच ते धोकादायकही ठरू शकते. अनेकदा लोक केवळ पोलीस कारवाई किंवा चालान टाळण्यासाठी हेल्मेट घालतात, पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. हेल्मेट हे पोलिसांसाठी नव्हे, तर तुमच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे. अपघाताच्या वेळी गंभीर दुखापत टाळण्यासाठी हेल्मेट सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते.

स्पीडमध्ये बाईक चालवणे हे जितके रोमांचक आहे, तितकेच ते धोकादायकही ठरू शकते. अनेकदा लोक केवळ पोलीस कारवाई किंवा चालान टाळण्यासाठी हेल्मेट घालतात, पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. हेल्मेट हे पोलिसांसाठी नव्हे, तर तुमच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे. अपघाताच्या वेळी गंभीर दुखापत टाळण्यासाठी हेल्मेट सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते.

2 / 6

दुचाकी चालवताना मागच्या सीटवर बसणाऱ्या व्यक्तीलाही आता हेल्मेट घालणे सरकारने बंधनकारक केले आहे. पण अनेकदा काही लोक लूक खराब होतो किंवा अस्वस्थ वाटते म्हणून लोक हेल्मेट घालणं टाळतात. परंतु, जर तुम्ही स्वतःच्या सुरक्षेसाठी नवीन हेल्मेट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खालील गोष्टी आवर्जून तपासा.

3 / 6

नवीन हेल्मेट खरेदी करताना सर्वात आधी त्याचे सुरक्षा मानक तपासा. हेल्मेटवर ISI चिन्ह (ISI Mark) असणे अत्यंत आवश्यक आहे, जे त्याच्या चांगल्या गुणवत्तेची हमी देते. याशिवाय, हेल्मेट डोक्याला व्यवस्थित फिट आणि आरामदायक बसेल असेच निवडा. डोके थंड राहण्यासाठी त्यामध्ये हवा खेळती राहण्याची (व्हेंटिलेशन) चांगली सोय असावी.

4 / 6

सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेटमधून समोरील रस्ता स्पष्ट दिसणे गरजेचे आहे. यासाठी हेल्मेटचा व्हिझर (काच) चांगल्या दर्जाचा असावा. काळ्या रंगाचा (Tinted) व्हिझर खरेदी करणे टाळा, कारण रात्रीच्या वेळी यामुळे दृश्यमानता कमी होऊन अपघात होऊ शकतो. साधे आणि क्लिअर व्हिझर कधीही उत्तम. तसेच, धुक्याच्या दिवसांत सोयीचे पडेल असे अँटी-फॉग वैशिष्ट्य असलेले हेल्मेट निवडल्यास अधिक फायदा होतो.

5 / 6

हेल्मेट वजनाने हलके असावे, जेणेकरून ते डोक्यावर जड वाटणार नाही. बाजारात फुल-फेस (Full-Face) आणि हाफ-फेस (Half-Face) असे दोन्ही पर्याय मिळतात. काही लोक हवेसाठी हाफ-फेसला पसंती देतात, पण सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण चेहरा झाकणारे फुल-फेस हेल्मेटच सर्वात सुरक्षित मानले जाते.

6 / 6

जर तुम्ही स्पोर्ट्स बाईक चालवत असाल, तर ट्रॅक डे हेल्मेटचा विचार करा. हे फुल-फेस हेल्मेट असून यात एअर व्हेंट्स असतात. हे सामान्य हेल्मेटपेक्षा थोडे महाग असले तरी सर्वोत्तम संरक्षण देते. ॲडव्हेंचर रायडिंगची आवड असणाऱ्यांसाठी ADV हेल्मेट किंवा मॉड्युलर मोटोक्रॉस हेल्मेट उत्तम पर्याय आहेत. यामध्ये अतिरिक्त पॅडिंग असते, जे अपघाताच्या वेळी डोके सुरक्षित ठेवते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us