
हेमा मालिनी यांनी अलीकडेच गुलाबी रेशमी साडीतील त्यांचा पारंपारिक उत्सवी लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हेमा मालिनी यांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

हेमा मालिनी कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात. चाहत्यांना देखील हेमा मालिनी यांचा प्रत्येक लूक आवडतो...

हेमा मालिनी वयाच्या 76 व्या वर्षी देखील सुंदर दिसतात. शिवाय वेगवेगळ्या स्टाईलमध्ये साडी नेसून त्या चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.

आता गणपती, दसरा, दिवाळी असे सण येणार आहेत. त्यामुळे सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही हेमा मालिनी यांच्यासारखी स्टाईल करु शकता...

सिंपल साड्या नेसून तुम्ही त्यावर ज्वेलरी देखील घालू शकता... हेमा मालिनी यांनी ज्या प्रकारच्या साड्या नेसल्या आहेत, त्या तुम्हाला सहज बाजारात उपलब्ध होतील... अनेक महिला हेमा मालिनी यांची स्टाईल फॉलो करतात....