
धर्मेंद्र यांचा सध्या कठीण काळ असून दोन्ही पत्नींची त्यांना साथ मिळतेय. पहिल्या पत्नीसोबतच्या त्यांच्या वैवाहिक नात्याला 71 वर्ष झाली आहेत, तर दुसरी पत्नी हेमा मालिनी सोबतच्या त्यांच्या विवाहाला 45 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण तुम्हाला हे माहित आहे का? धर्मेंद्र दोघींपैकी कोणाला सुंदर महिला मानतात?

धर्मेंद्र यांनी 14 वर्षांपूर्वी एका इंटरव्यूमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न 1954 साली प्रकाश कौर यांच्यासोबत झालं. 26 वर्षानंतर 1980 साली त्यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. त्यावेळी दोघांवर इस्लाम धर्म स्वीकारुन लग्न केल्याचा आरोप झालेला.

धर्मेंद्र 2011 साली एका इंटरव्यूमध्ये दुसरी पत्नी आणि दिग्गज कलाकार हेमा मालिनी यांच्याबद्दल बोललेले. हेमा यांच्यासोबतच्या नात्यावर धर्मेंद्र म्हणालेले की, 'आमचं नातं खूप सुंदर आहे. त्यानंतर ते आपल्या प्रोफेशनल लाइफबद्दल बोललेले'

"आम्ही सोबत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आम्हाला पडद्यावरील प्रेक्षकांची आवडीची जोडी मानलं जातं. आमची केमिस्ट्री कमाल आहे. आम्ही दोघे परस्परांना परिपूर्ण करतो" असं धर्मेंद्र हेमा मालिनी यांचं कौतुक करताना म्हणालेले.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी सोबत 35 चित्रपट केले. त्यातले 20 चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. हेमा मालिनी यांच्यासोबत काम करताना मजा आल्याचं धर्मेंद्र यांनी कबूल केलेलं. "मी ओळखत असलेली ती सुंदर महिला आहे. ती खूप काळजी घेणारी आहे. मी तिचा भरपूर आदर करतो" असं धर्मेंद्र हेमा मालिनीच कौतुक करताना म्हणालेले.