Splendor पेक्षा स्वस्त बाइक, लोक तुटून पडले, 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी विकत घेतली
भारतीय बाजारपेठेत कम्यूटर सेगमेंट्सच्या बाइक्सची नेहमीच डिमांड राहिली आहे. हीरो स्प्लेंडर अनेक दशकापासून या सेगमेंटमध्ये बादशाह आहे. कंपनी दर महिन्याला Hero Splendor च्या जवळपास 4 लाख यूनिट्सची विक्री करते. पण अजून काही बाइक्स आहेत, ज्या लोकांना खूप आवडतात.

Hero HF Deluxe अशीच एक बाइक आहे, ज्याची किंमत स्प्लेंडर पेक्षा खूप कमी आहे. ऑक्टोंबर महिन्यात 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी ही बाइक विकत घेतली. मागच्यावर्षी 22 सप्टेंबरला GST 2.0 लागू झाल्यानंतर या बाइकच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली. त्यामुळे बाइकची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
बाइकला फक्त फेस्टिव सीजनचा फायदा मिळाला. 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी ही बाइक विकत घेतली. यंदाच्या ऑक्टोंबर महिन्यात एचएफ डिलक्सच्या एकूण 1,09,085 यूनिट्सची विक्री झाली. मागच्यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात विकल्या गेलेल्या 1,13,998 यूनिटच्या तुलनेत हा आकडा 4 टक्के कमी आहे.
Hero HF सीरीजच्या दोन बाइक्स येतात. एक एचएफ 100 त्याची किंमत 59,839 रुपये आहे. दुसरी आहे, HF Deluxe त्याची किंमत 59,477 रुपये आहे.
या बाइकला स्प्लेंडर प्रमाणे 97.2 सीसीचं इंजिन दिलं आहे. त्याची 8.02 PS पावर आणि 8.05 Nm टॉर्क जेनरेट होतो. या इंजिनला 4-स्पीड गियरबॉक्सशी जोडलेलं आहे. बाइकमध्ये चांगल्या मायलेजसाठी Hero ची XSens फ्यूल इंजेक्शन टेक्नोलॉजी आणि निवडक वेरिएंट मध्ये i3S दिलं आहे.
त्या शिवाय HF Deluxe मध्ये ट्यूबलेस टायर, 18 इंचाचं व्हील, फ्रंट आणि रियर 130 मिमी ड्रम ब्रेक सह इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टिम (IBS) दिली आहे. बाइक मध्ये 9.6 लीटरा फ्यूल टँक दिला आहे. सामान्यत: ही बाइक जवळपास 70 किमी प्रतिलीटरचा मायलेज देते.