अहमदनगरमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन, श्री संत शेख महमदबाबा यात्रेला सुरवात

| Updated on: Mar 15, 2022 | 2:01 PM

राज्यात फाल्गुन महिन्याची सुरुवात झाली आहे. अहमदनगरला श्रीगोंदा येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या श्री संत शेख महमदबाबा यांच्या यात्रेला सुरवात झालीये.

1 / 5
राज्यात फाल्गुन महिन्याची सुरुवात झाली आहे. अहमदनगरला श्रीगोंदा येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या श्री संत शेख महमदबाबा यांच्या यात्रेला सुरवात झालीये. कोरोना महामारीमुळे दोन वर्ष यात्रा न झाल्याने यावर्षी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

2 / 5
शेख महम्मद महाराज हे या गावचं ग्रामदैवत असून होळीच्या चार दिवस आधी एकादशीला ही यात्रा भरवली जातेय. विशेष म्हणजे मुस्लिम संताचे ठिकाण ग्रामदैवत म्हणून ओळखल जात हे या यात्रेच वैशिष्ट्य आहेय. तसेच यात्रेपुर्वी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.

3 / 5
दोन दिवस यात्रोत्सव सुरू असतो. या यात्रोत्सवात हिंदू-मुस्लिमांचा सक्रिय सहभाग असतो. यात्रेच्या दिवशी बाबांना स्नान घालून चंदनाचा लेप लावला जातो. संध्याकाळी वाजतगाजत छबिना आणि पालखी निघते.

4 / 5
पालखीमध्ये महाराजांच्या पादुकांची प्रतिष्ठापना करून बाबांच्या नारायण अश्वासह पालखी निघते. दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचा फड रंगतो. वर्षातून पाच वेळा बाबांच्या समाधीला चंदनलेप लावला जातो, तर दर गुरुवारी भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात.

5 / 5
अनेक जण या यात्रेत सहभागी होताना दिसत आहे. यावेळी श्री संत शेख महमदबाबा यांना फुलांच्या चादरीने सजवण्यात आला आहे.