लग्नात नववधूच्या कमरेला ओटी का बांधलेली असते? सासर की माहेर कशासोबत आहे कनेक्शन

नववधूच्या कमरेला बांधलेली ओटी हिंदू विवाह परंपरेतील एक महत्त्वाचा विधी आहे. हे केवळ सौभाग्य, समृद्धी आणि नवीन कुटुंबाकडून मिळालेला आशीर्वाद नसून, वाईट नजरेपासून संरक्षण आणि शारीरिक आधार देणारी 'ऊर्जा बंध' देखील मानली जाते.

| Updated on: Nov 19, 2025 | 3:03 PM
1 / 8
आपण अनेकदा लग्नसोहळ्यात नववधूच्या कमरेभोवती ओटी बांधलेली असते. पण ही ओटी नेमकी का बांधतात? नववधूच्या कंबरेला असलेली ओटी नेमकं कशाचे प्रतीक असते, असा प्रश्न अनेकदा पडलेला असतो. आज आपण यामागचे कारण जाणून घेणार आहोत.

2 / 8
हिंदू संस्कृतीत लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसते, तर ते दोन कुटुंबे, दोन परंपरा आणि दोन संस्कृतींची पवित्र भेट असते. या सोहळ्यातील प्रत्येक विधीचे एक गहन अर्थ आणि महत्त्व असते.

3 / 8
नववधूच्या कमरेला ओटी बांधणे ही त्यापैकीच एक महत्त्वाची प्रथा आहे, ज्याला धर्मग्रंथांपासून ते शारीरिक संरक्षणापर्यंत अनेक पैलू जोडलेले आहेत. हिंदू पुराणांनुसार, वधूने कंबरेला बांधलेली ओटी म्हणजे संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्याचा आशीर्वाद मानला जातो.

4 / 8
नववधू जेव्हा सासरी जाते, तेव्हा नवीन कुटुंबाची पहिली भेट, पहिलं स्वागत आणि पहिला आशीर्वाद म्हणून या ओटीकडे पाहिलं जातं. या कृतीमुळे घरात सौभाग्य आणि समृद्धीची भरभराट होते, अशी प्रबळ भावना समाजात आहे.

5 / 8
ही ओटी म्हणजे तिच्या नवीन कुटुंबाकडून नवीन जीवनासाठी मिळालेली पहिली भेट असते. या ओटीला अनेकदा ऊर्जा बंध (Energy Band) किंवा संरक्षण पट्टी (Protection Strip) असेही म्हटले जाते.

6 / 8
लग्नाच्या दिवशी होणाऱ्या धावपळीत, कंबर स्थिर राहावी आणि शरीराला योग्य आधार मिळावा यासाठी ही पट्टी उपयुक्त ठरते. धार्मिक मान्यतांनुसार, लग्नाच्या वेळी नववधूला कोणाची वाईट नजर लागू नये, यासाठी संरक्षणाच्या वस्तू तिच्यासोबत किंवा तिच्या कमरेतील ओटीत बांधल्या जातात.

7 / 8
नववधूच्या सुरक्षिततेसाठी आणि मानसिक शांततेसाठी बांधलेल्या वस्तूंपैकी ओटी हे एक महत्त्वपूर्ण संरक्षण कवच मानले जाते. ओटी दिसायला लहान असली तरी तिचे महत्त्व प्रचंड आहे. यामुळे नववधूला सौभाग्य, समृद्धी आणि संरक्षणाचा आशीर्वाद देतो.

8 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)