आधी धूर, मग आगीचं रौद्ररुप, हिंगोली रेल्वे स्थानकात भीषण दुर्घटना

हिंगोली रेल्वे स्थानकावर एका जुनी रेल्वे डब्याला आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाने आगीवर ताब्या मिळवला, पण डब्याचे मोठे नुकसान झाले. रेल्वे प्रशासन आगीच्या कारणाचा तपास करत आहे. डबा आधी मॉकड्रिलसाठी वापरला गेला होता.

| Updated on: Aug 06, 2025 | 2:21 PM
1 / 6
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यातच आता हिंगोली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका जुन्या रेल्वे डब्याला आग लागल्याची घटना घडली आहे.

2 / 6
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

3 / 6
हिंगोली रेल्वे स्थानकात एका बाजूला हा जुना डबा उभा होता. अचानक त्यातून धूर निघू लागला.  यानंतर बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

4 / 6
आग लागलेल्या डब्याचा काही दिवसांपूर्वीच मॉकड्रिलसाठी वापर करण्यात आला होता. त्यानंतर ही आग लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

5 / 6
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.  या आगीत डब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

6 / 6
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. या आगीचे कारण शोधण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तपास सुरू आहे