
आता होळीचा सण असल्यानं तुमच्या लाडक्या मालिकांमध्ये होळी स्पेशल एपिसोड्सचं शूटिंग पार पडलं आहे. तुम्हाला या मालिकांमध्ये होळीचा आनंद लुटता येणार आहे.

तसंच आता ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेतही होळी स्पेशल धमाल अनुभवायला मिळणार आहे.

मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री नेहा पेंडसे आता ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत ‘गोरी मेम’ म्हणून नेहा पेंडसे सर्वांनाच पसंत पडलीय.

आता तुमच्या लाडक्या गोरी मेमनं तिचा होळी स्पेशल लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्हीही हा लूक ट्राय करू शकता.

नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर येणारी गोड अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते. नुकतंच नेहाने पांढऱ्या साडीतलं एक सुंदर आणि जबरदस्त फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे.